Join us  

पीएनबीच्या जनरल मॅनेजरला अटक, २00८ पासूनच सुरू होता घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:13 AM

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) ११,४00 कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी शाखेचा माजी प्रमुख राजेश जिंदाल याला बुधवारी अटक करण्यात आली

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) ११,४00 कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी शाखेचा माजी प्रमुख राजेश जिंदाल याला बुधवारी अटक करण्यात आली. या घोटाळ्यात बँकेच्या सरव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) दर्जाच्या अधिकाºयास पहिल्यांदाच अटक झाली आहे. अटक झालेल्या पीएनबी अधिकाºयांची संख्या आता ६ झाली आहे. जिंदाल हा २00९ ते २0११ या काळात ब्रॅडी हाउस शाखेचा प्रमुख होता. याशिवाय मंगळवारी मोदीच्या कंपनीच्या वित्त विभागाचा प्रमुख विपुल अंबानी याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आलीच होती.दरम्यान, नीरव मोदीने भारतातील आपल्या सर्व कर्मचाºयांना तुम्ही अन्यत्र नोकºया शोधा, असे सांगितले आहे, तसेच त्यांना पगार देणे शक्य नसल्याचेही कळविण्यात आले आहे.राजेश जिंदाल याला आज सकाळीच सीबीआयने अटक केली. काल ज्यांना अटक करण्यात आली, त्यात कार्यकारी सहायक कविता मानकीकर, वरिष्ठ कार्यकारी अर्जुन पाटील, नक्षत्र समूह व गीतांजली समूहाचा मुख्य वित्त अधिकारी कपिल खंडेलवाल, गीतांजली समूहाचा व्यवस्थापक नितेन शाही यांचा समावेश आहे. त्या आधी गोकुळनाथ शेट्टी व मनोज खरात यांनाही अटक झाली होती. गोकुळनाथ शेट्टी याच्या जबाबातून नवनवी माहिती पुढे येत असल्याचे सीबीआयने सांगितले.हा घोटाळा २0११ पासून सुरू आहे की, २0१४ पासून यावरून वाद सुरू असताना, गोकुळनाथ शेट्टी याने मात्र २00८ पासून या पद्धतीने नीरव मोदीला लेटर आॅफ अंडरटेकिंग देणे सुरू होते, असे सीबीआयला सांगितले आहे. याचाच अर्थ, नीरव मोदीने या लेटर्सच्या आधारे २00८ पासून कर्जे घेणे व त्या रकमा अन्यत्र वळविणे सुरू केले, असा होतो.स्वतंत्र चौकशीला सरकारचा विरोधया ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या संदर्भात बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी अणि मुख्य संशयित व हिरे व्यापारी नीरव मोदी यास तत्काळ देशात परत आणले जावे, अशी मागणी करणाºया एका जनहित याचिकेस केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. अ‍ॅड. विनित धंदा यांनी केलेलीही याचिका सरन्यायाधीशन्या. दीपक मिस्रा यांच्या खंडपीठापुढे पुकारली गेली,तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी याचिकेस सरकारचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून रीतसर तपास सुरू केल्याचे ते म्हणाले.सरकारने विरोधाची सविस्तर कारणे स्पष्ट करावीत, असे सांगून पुढील सुनावणी १६ मार्च रोजी ठेवली गेली. तरीही याचिकाकर्ता घोटाळा गंभीर आहे व त्याला सरकारमधील वरिष्ठांचा वरदहस्त आहे, हे सांगत राहिला. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड यांनी तुमची याचिका प्रसिद्धीसाठी केल्याचे दिसते, असे बोलून दाखविले.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळानीरव मोदी