Join us

छतावर मशरूम उत्पादन करण्यासाठी योजना

By admin | Updated: October 24, 2014 03:43 IST

शहरातील घरांच्या छतावर मशरूमसारख्या बागेतील पीक उत्पादनाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने प्रोत्साहन योजना राबविणार आहे.

नवी दिल्ली : शहरातील घरांच्या छतावर मशरूमसारख्या बागेतील पीक उत्पादनाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने प्रोत्साहन योजना राबविणार आहे. पीएचडी चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने येथे आयोजित केलेल्या ‘डायनामिक्स आॅफ अर्बन एंड प्री अर्बन हॉर्टिकल्चर’वर आयोजित संमेलनात मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कुमार तिवारी म्हणाले की, नजीकच्या भविष्यात व्यापारी क्षेत्रासह निवासी क्षेत्रात ऊर्जा उत्पादनासाठी बरेच सौरपंखे लावले जातील.मशरूमच्या पिकासाठी या सौरपंख्यांचा उपयोग होईल. वसाहतींत जमा होणारे पाणी पंपांद्वारे वर घेऊन ते मशरूमच्या उत्पादनासाठी वापरले जाऊ शकते, असे तिवारी यांनी सांगितले. या पिकासाठी मंडळ तांत्रिक व आर्थिक मदत देईल, त्यातून हरित भारतासाठी शहर आणि निमशहरी भागात अशा बाग उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाईल, असे तिवारी म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)