Join us

बोधडीच्या राज्य रस्त्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST

बोधडी: येथील राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

बोधडी: येथील राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
राज्य रस्ता दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच डागडुजी करुन बनविण्यात आला. किनवट-नांदेड राज्य रस्त्यावर असलेल्या बोधडी ते चिखली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच चिखली ते बोधडी रस्त्याची गि˜ी टाकून डागडुजी करण्यात आली. परंतु दोन वेळेस आलेल्या पावसामुळे पूर्ण गि˜ी निघून गेली आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील उघड्या गि˜ीमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक वेळा संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे नागरिक व वाहनचालक संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पाऊणतास लागत आहे. त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)