Join us

पिंपळसोंड आदिवासी गावात वैद्यकीय सेवेचा अभाव ग्रामस्थ संतप्त : गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

सुरगाणा : तालुक्यातील पिंपळसोंड या अति दुर्गम भागात आरोग्य सेवेअभावी रुग्णाचे मोठे हाल होत आहे. याठिकाणी डॉक्टर कधी मिळणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.

सुरगाणा : तालुक्यातील पिंपळसोंड या अति दुर्गम भागात आरोग्य सेवेअभावी रुग्णाचे मोठे हाल होत आहे. याठिकाणी डॉक्टर कधी मिळणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.
तालुक्याच्या अतिदुर्गम गाव पिंपळसोंड गुजरात सीमेवर डोंगरदर्‍यात वसलेले १0 ते १२ वर्षापूर्वी पेठ आगाराची बस या गावी मुक्कामी जात होती. जेमतेम ३ ते ४ वर्षे बस गेली. त्यानंतर अद्याप या गावाला बसचे दर्शन झाले नाही. खाजगी ठेकेदाराने रस्ता केला मात्र पहिल्याच पावसाळ्यात खराब झाला. पूर्णत: उखढला. आरोग्य, शिक्षण, वीज, दळणवळण या समस्या नेहेमीच आहेत.
पिंपळसोंड गावी दरवर्षी शासनाच्या ग्रामीण जीवनदायी आरोग्य अभियानांतर्गत पावसाळ्याच्या ६ महिन्यांसाठी शासनाकडून मानधनावर मानसेवी वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक होत असते. मात्र सदर वैद्यकीय अधिकारी पिंपळसोंड गावी पोहचतच नाहीत. पिंपळसोंड गावापासून १0 ते १२ कि.मी. दूर असलेल्या पांगारणे या गावी असलेल्या प्राथमिक ग्रामीण रुग्णालयातच डॉक्टरांचा मुक्काम असतो. पावसाळा सुरूवात होऊन तीन महिने संपत आले मात्र नेमणूक झालेले मानसेवी डॉक्टर ग्रामस्थांपर्यंत पोहचलेच नाहीत. साधे डोके दुखीवर किंवा तापावरचे औषधदेखील या गावाम मिळणे दुरापास्त आहे. डोके दु:खी वेदनाशामक गोळी घेण्यासाठी मोबाईल टॉवर नसल्यामुळे शासनाने सुरू केलेल्या अत्यावश्यक सेवा १0८ या सेवेचा लाभ घेता येत नाही. १0८ सेवा अद्याप दुर्गम भागात पोहचली नाही. मालेगाव, झारणीपाडा, उदालदरी, वांगण (बर्डा), चिंचमाळ, मोहपाडा, उंबरपाडा, खुंटविहिर, रानविहिर, डोल्हारे, सारणे आवण या सारखी शेकडो गावे अद्याप शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित आहेत.
पिंपळसोंड गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास मात्र या गावात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देखील नाही. गावात पावसाळ्याच्या दिवसात ७ ते ८ दिवस वीज नेहमीच गायब असते. वीज असलीच तर रात्री भारनियमन असते. त्यामुळे रात्री घराबाहेर पडणे मुश्कील होते. सर्पदंश, जंगली श्वापदे, श्वानदंश, शेतात काम करताना अपघात झाल्यास रुग्णाला प्राथमिक उपचार पण मिळू शकत नाही. आकस्मिक आजार उद्भवल्यास गुजरातमधील वासदा, वघई, साकरपातळ, उकाई जवळील गारेल या गावाचा रस्ता गंभीर आजाराच्या उपचारासाठी धरावा लागतो. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची जाणीव जागृती, अथवा लाभ या परिसरातील जनता अनभिज्ञ आहे. त्याविषयी आरोग्य विभागाने जनजागृती करणे आवश्यक.