नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाकरिता प्रॉव्हिडंट फंडावरील व्याजदर गेल्या आर्थिक वर्षाइतकाच म्हणजे ८.७५ टक्के इतका निश्चित केला आहे. प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. बैठकीनंतर बोलताना विभागाचे केंद्रीय आयुक्त के.के. जालान यांनी या निर्णयाची माहिती दिली. विभागाच्या सुमारे पाच कोटी सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पीएफचा व्याजदर ८.७५ टक्केच
By admin | Updated: August 27, 2014 04:29 IST