Join us  

पेट्रोल-डिझेल होणार ५० पैशांनी स्वस्त, लवकरच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:56 AM

खनिज तेलाचे दर एकाच दिवसात जवळपास ३ डॉलर प्रति बॅरलने (सुमारे १.२९ रुपये प्रति लीटर) घसरले.

नवी दिल्ली : खनिज तेलाचे दर एकाच दिवसात जवळपास ३ डॉलर प्रति बॅरलने (सुमारे १.२९ रुपये प्रति लीटर) घसरले. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवडाभरात घट होण्याची शक्यता आहे. पण खनिज तेल १.२८ रुपयांनी घसरले असले तरी तेल कंपन्या ५० पैशांचाच दिलासा देण्याच्या विचारात आहेत.रुपया डॉलरसमोर किंचित मजबूत झाला असतानाच खनिज तेलाच्या दरात मंगळवारी मोठी घट झाली. त्यामुळे पेट्रोल ११ व डिझेल १३ पैशांनी स्वस्त झाले. आता सरकारी तेल कंपन्या पुढील चार दिवस अभ्यास करून ४० ते ५० पैशांचा दिलासा देतील, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.सरकारी तेल कंपन्यांनी कर्नाटक निवडणुकीनंतर सलग १६ दिवसांत पेट्रोल ३.७३ व डिझेलच्या दरात ३.८३ रुपये प्रति लीटरने वाढ केली होती. त्यानंतर २९ मे ते ४ जुलैदरम्यान पेट्रोल ३.२६ व डिझेल २.३४ रुपये प्रति लीटरने कमी करण्यात आले. पण ५ ते १३ जुलैदरम्यान नऊ दिवसांत पुन्हा पेट्रोल १.६३ व डिझेल २.१५ने महाग केले. आता खनिज तेलाचे दरच कमी होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.पेट्रोल ८४.२०, डिझेल ७२.६६ रुपयेपेट्रोल व डिझेलचे दर शनिवार ते सोमवार स्थिर होते. त्यानंतर मंगळवारी त्यात कपात झाली. सध्या मुंबईसह राज्यात पेट्रोलचा सरासरी दर ८४.२० व डिझेलचा दर ७२.६६ रुपये प्रति लीटरदरम्यान आहे.>आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेल सोमवारी ७४.४१ डॉलरवरून मंगळवारी ७१.५९ डॉलर प्रति बॅरलवर आले. पेट्रोलियम मंत्रालयानेसुद्धा खनिज तेलाचा सरासरी आयात दर ७२.५१ डॉलर निश्चित केला आहे. तसे असताना तेल कंपन्या मात्र ८२.५७ डॉलरनुसार पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करीत आहेत. त्यांनी मंत्रालयाचा दर ग्राह्य धरल्यास पेट्रोल व डिझेल आणखी किमान ४ रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकणार आहे.