तरुण तेजपालवर पुरवणी आरोपपत्रास परवानगी
By admin | Updated: June 19, 2014 22:31 IST
तरुण तेजपालवर पुरवणी आरोपपत्रास परवानगी
पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तरुण तेजपाल यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यास येथील जलद न्यायालयाने तपास अधिकार्यांना परवानगी दिली आहे. सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले तेजपाल सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. फौजदारी संहितेच्या कलम १७३ (८) अन्वये न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. तपास अधिकार्यांना न्यायालयात आणखी पुरावे सादर करायचे आहेत. तपास अधिकारी सुनिता सावंत यांनी याचिकेत असे म्हटले होते की, हैदराबादच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेतून डीव्हीडी, ब्लॅकबेरी मोबाइलसंबंधी काही अहवाल प्राप्त झाले आहेत. त्याची नोंद होणे आवश्यक आहे. एक साक्षीदार देशाबाहेर आहे. त्याच्याशी संपर्क झालेला आहे, त्याचा प्रतिसाद मिळणे बाकी आहे. या प्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी आरोपपत्र सादर केले होते. तेजपाल यांच्या वकिलाने पुरवणी आरोपपत्रास विरोध केला. परंतु तो मान्य न करता अतिरिक्त पुरावे सादर करण्यासाठी न्यायालयाने तपास अधिकार्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली. ४ जुलैपर्यंत ते सादर करावे लागतील. (प्रतिनिधी)