मुंबई : आॅनलाईन तक्रार निवारणप्रणाली न राबविल्याबद्दल सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) सहा कंपन्यांना आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वेलिंग्टन कमर्शियल, सुमित इंडस्ट्रीयल फायनान्स, श्री कृष्ण ज्यूट प्रोडक्टस् आणि पोर्ट शिपिंग कंपनीला प्रत्येकी दीड लाख रुपये आणि टी अँड आय प्रोजेक्टस् आणि सुराणा मेटल्स यांना प्रत्येकी एक-एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र आदेश देण्यात आलेआहेत.सगळ्या नोंदणीकृत कंपन्यांना १४ सप्टेंबर २०१४ पर्यंत आॅनलाईन तक्रार निवारणप्रणाली (स्कोर्स) लागू करण्यास सेबीने २०१२ मध्ये सांगितले होते. गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारी, तक्रारीवर काय कार्यवाही केली त्याची स्थिती आणि केलेली कार्यवाही आॅनलाईन उपलब्ध व्हावी यासाठी सेबीने स्कोर्सची सुरुवात २०११ मध्ये केली होती. या प्रणालीमुळे गुंतवणूकदारांना आपल्या तक्रारीचे काय झाले, हे बघता येते.सेबीच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून, सेबीला थेट कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अलीकडील काळात सेबीकडून कंपन्यांच्या निरंकुश कारभारावर कारवाई होताना दिसत आहे. बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचचले आहे.
नियमभंग करणा-या ८ कंपन्यांना सेबीकडून ८ लाख रुपयांचा दंड
By admin | Updated: December 4, 2014 00:32 IST