सिंगापूर : पश्चिम आशियातील तणावामुळे खनिज तेलाचे उत्पादन घटले आहे. त्यातच अमेरिकेनेही आपल्या तेल उत्पादनात कपात केली आहे. या पाश्र्वभूमीवर आशियाई बाजारात तेलाचे भाव वधारले असून, ते आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
या आठवडय़ाच्या मध्यास अमेरिकी बाजारात सप्टेंबरसाठी झालेल्या खरेदीत तेलाचा भाव दोन सेंटनी वधारून 1क्3.14 डॉलर झाला. ब्रेंट कच्च तेलाचा भाव आठ सेंटनी वाढून 1क्8.11 डॉलर झाला. अमेरिकी ऊर्जा विभागाच्या अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी संपलेल्या आठवडय़ात तेल प्रकल्पातून चार दशलक्ष बॅरल उत्पादन घटले आहे. गेल्या चार आठवडय़ांपासून यात घट होत आहे. कुशिंग, ओख्लोहोमा येथील साठय़ात 1.5 दशलक्ष बॅरल तेलाची घट नोंदली गेली आहे. या घसरणीमुळे मागणी वाढली असून भावही वधारले आहेत. अमेरिकेत सध्या उन्हाळी ड्रायव्हिंग हंगाम सुरू आहे. या काळात अमेरिकन नागरिक मोठय़ा प्रमाणावर सुटी साजरी करण्यासाठी गाडय़ांसह रस्त्यावर येतात. यामुळे या काळात पेट्रोलच्या मागणीत प्रचंड वाढ होते. (वृत्तसंस्था)
4गाझापट्टीवरील संघर्ष, इराकमधील अराजक, युक्रेन सीमेवरील तणाव या पाश्र्वभूमीवर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर लिबियात लोकशाही पद्धतीने सत्तांतर होण्याचे संकेत आहेत.
4 हुकूमशहा मोहंमद गद्दाफी यांच्या निघृण हत्येनंतर देशात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे.