Join us

पान २ : इफ्फीसाठी १ कोटींचा निधी प्रायोजकांकडून

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST

इफ्फीसाठी १ कोटींचा

इफ्फीसाठी १ कोटींचा
निधी प्रायोजकांकडून
यंदा खर्चाची मोठी बचत : अनेक उपक्रमांचा केला फेरविचार
पणजी : येथे झालेल्या ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावरील खर्चात यंदा बरीच कपात करण्यात आली. दरवर्षी होणार्‍या इफ्फीला साधारण १० कोटींच्या आसपास खर्च होत असे. यंदा एक कोटींचा निधी प्रायोजकांकडून मिळाला. त्यामुळे खर्चाचा आकडा कमी होईल, असा दावा मनोरंजन संस्थेच्या सूत्रांनी केला.
दहा वर्षांत इफ्फीसाठीच्या खर्चाचा कच्चा आढावा घेतल्यास दहा कोटींपेक्षा जास्त खर्च येतो. भारत सरकार व राज्य सरकारतर्फे हा खर्च केला जातो. यंदा जास्तीत जास्त प्रायोजकांसाठी प्रयत्न केला होता. विविध क्षेत्रातील या प्रायोजकांकडून एक कोटी मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन साधारण दोन कोटींची बचत केली. विविध शहरात स्क्रिनिंगचा खर्चही एक कोटींच्या आसपास जात असल्याने तोही रद्द केला. कांपाल येथील फुटबॉल मैदानावर उभारण्यात येणार्‍या हँगरलाही दोन ते अडीच कोटी खर्चिले जात; पण यंदा श्यामा मुखर्जी स्टेडियममध्ये उद्घाटन आणि समारोप समारंभ झाल्याने या खर्चातही कपात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कमी खर्चात उत्कृष्ट इफ्फीचे आयोजन हेच यंदाच्या इफ्फी आयोजनामागचे ध्येय होते. वैशिष्ट्यपूर्ण सजावट हीच यंदा इफ्फीची थिम होती. या कामातही साधारण एक कोटींची बचत केली. ई-निविदा प्रक्रियेमुळे दीड कोटी वाचले. एकूण साधारण सात कोटी रुपये वाचविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इफ्फीचा समारोप होऊन दोन दिवस झाले. आता सर्व बिले देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण खर्च आणि बचत किती झाली, हे स्पष्ट होईल. सर्व इफ्फीपेक्षा यंदा मात्र खर्चात चांगली कपात केल्याचे, सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)