Join us

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा
कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना पाचगावात मताधिक्य न मिळाल्याची नैतिक जबाबदारी स्विकारत पाचगावच्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रक सरपंच राधिका खडके यांनी प्रसिद्धीस दिले.
पत्रकात म्हटले आहे की, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाच वर्षात मतदार संघात मोठी विकासकामे केली. पाचगावातही प्रंचड कामे केली. आम्ही त्यांच्या विजयासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पण मताधिक्य देऊ शकलो नाही. म्हणून मी या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.