पान-२ अवेळी पावसाने भातशेतीचे नुकसान
By admin | Updated: October 25, 2014 22:48 IST
अवेळी पावसाने भातशेतीचे नुकसान
पान-२ अवेळी पावसाने भातशेतीचे नुकसान
अवेळी पावसाने भातशेतीचे नुकसानपणजी : अवेळी आलेल्या पावसाने राज्यातील शेतकर्यांच्या तोंडाचा घास पळविला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भातकापणी सुरू आहे. काही शेतकर्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर भातकापणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दोन दिवसांपासून पडणार्या अवेळी पावसामुळे शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. जोराच्या पावसामुळे शेतीची हानी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांनी भातशेती कापून ठेवलेल्या भातात पाणी गेले. पाऊस सलग दोन-तीन दिवस पडत राहिल्यास कापलेल्या भाताला कोंब फुटण्याची शक्यता आहे. यंदा पुरेसा पाऊस पडल्याने भातपिक चांगले आले होते. मात्र, अवेळी कोसळणार्या पासवामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. यंदा जास्त प्रमाणात शेतीची लागवड करण्यास शेतकर्यांनी उत्सुकता दाखविली होती. बार्देस, पेडणे, डिचोली, मये, केपे, कुंकळ्ळी, बाळ्ळी, काणकोण, इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यात श्रीपद्धतीने भातशेतीची लागवड करणार्या शेतकर्यांचा सहभाग आहे. ज्या शेतीत पाणी वाहून गेले आहे तेथील भात खराब होण्याची शक्यता आहेे. -------------------काही शेतकरी भात पिकले की स्वत:च कापणी करतात, तर हल्ली बहुतांश शेतकरी खात्याकडून देण्यात येणार्या मशिनसाठी थांबतात. दिवाळीनंतर भातकापणीला योग्य काळ असतो. यंदा अवेळी आलेल्या पावसाने शेतकर्यांचा हिरमोड झाला आहे. कृषी खाते भात लागवडीत वाढ व्हावी म्हणून शेतकर्यांना मदत करते. मात्र, निसर्ग कोपला तर शेतकर्याने कुणाकडे मदत मागावी. नुकसान भरपाई म्हणून कृषी खात्याकडून आर्थिक साहाय्य दिले जाईल; पण ते पुरेसे नसते. नुकसानीला तर शेतकर्यांनाच तोंड द्यावे लागेल, असे फोंडा येथील दिनकर गावडे या शेतकर्याने सांगितले. ----------------------कृषी खात्यावर नुकसान भरपाईचा भारनुकसानग्रस्त शेतकरी येणार्या काही दिवसांत कृषी खात्यात नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज करण्यास सुरूवात करतील. त्यामुळे खात्यावर अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचा भार पडणार आहे. खात्यातर्फे कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यात गावे दत्तक घेण्यापासून ते आर्थिक साहाय्य आणि यंत्रे पुरवणे इत्यादी मदत केली जाते.