Join us

अवघ्या 329 सोसायट्यांची 100 टक्के वसुली कर्ज न भरण्याच्या मानसिकतेचा परिणाम: शेतकर्‍यांची पतही घसरतेय

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

भाग-3

कॅलिग्राफी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा
नाशिक : अक्षरांचा प्रवास हा भावना आणि मन यांच्या समन्वयातून होत असतो. अक्षरांतून व्यक्त होणारा भाव हा मनाशी निगडित अवस्थांचे प्रतिबिंब असते. चांगला विचार हा सकारात्मक जाणिवेतून निर्माण होतो. तसेच सुंदर वळणदार व शुद्ध हस्ताक्षर हे मनाचा आरसा असते, असे प्रतिपादन चित्रकार नंदू गवांदे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नाशिक आणि विश्वास को. ऑप. बॅँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने कॅलिग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. गवांदे पुढे म्हणाले, कोणतेही अक्षर आकार आणि रूप घेऊन येत असते. प्रत्येक अक्षरात स्वभाव असतो. त्यातून अक्षरचित्राचा जन्म होत असतो. यावेळी त्यांनी अक्षरांचा उगम, आकार याविषयी प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत रेषा, आकार, स्वरलेखन, शुद्धलेखन, व्यंजन लेखन, शब्दवाक्य लेखन, अक्षरसंहिता सादरीकरण या विषयावर तसेच संगीत व अक्षर यावर मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो २६ तारखेत आरला कॅलिग्राफी नावाने.