Join us  

१५ लाख विद्यार्थ्यांचा आॅनलाइन डाटा फुटला

By admin | Published: May 26, 2017 1:43 AM

विविध परीक्षांसाठी, तसेच प्रवेशासाठी फॉर्म भरताना नोंदविण्यात आलेला १५ लाख विद्यार्थ्यांचा खाजगी स्वरूपाचा गोपनीय डाटा फुटला असून, काही वेबसाईटस्वर तो

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विविध परीक्षांसाठी, तसेच प्रवेशासाठी फॉर्म भरताना नोंदविण्यात आलेला १५ लाख विद्यार्थ्यांचा खाजगी स्वरूपाचा गोपनीय डाटा फुटला असून, काही वेबसाईटस्वर तो विक्रीसाठी उपलब्धही झाला आहे. २00९ पासूनचा हा डाटा असून, त्याची किंमत १ हजार रुपयांपासून ६0 हजार रुपयांपर्यंत आहे.विद्यार्थ्यांची खाजगी माहिती असलेला हा गोपनीय डाटा कसा बाहेर आला, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. तथापि, संबंधित बोर्ड, विद्यापीठे, परीक्षा विभागाचे प्रभारी अथवा विविध परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्थांकडून हा डाटा बाहेर आला असावा, असा अंदाज आहे. हा डाटा विकणाऱ्या अनेक वेबसाईट उगवल्या आहेत. विशेष म्हणजे कुठल्या प्रकारचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे, याचे नमुनेही वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. स्टुडंटस् डाटाबेस डॉट ईन, केन्सिल डॉट को डॉट ईन, आॅल स्टुडंट डाटाबेस डॉट ईन यासारख्या काही वेबसाईटवर हा डाटा विक्रीसाठी ठेवला गेला आहे. संबंधित वेबसाईटस्कडून यासंबंधीच्या प्रश्नांवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वेबसाईटवर विक्रीला ठेवण्यात आलेल्या माहितीत विद्यार्थ्याचे नाव, त्याचे गुण, पर्सेंटाईल, लिंग, प्रवर्ग, पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, हा डाटा खरेदी करणाऱ्यांत बिझनेस स्कूलचा समावेश आहे. २0१0-११ मध्ये एमबीए प्रवेश परीक्षेला बसलेले, तसेच दिल्लीच्या एका महाविद्यालयातून पदवी मिळविणाऱ्या एका विद्यर्थ्याने सांगितले की, मला विविध बिझनेस स्कूलमधून दररोज सरासरी तीन ते चार फोन कॉल येतात. एप्रिल ते जून या काळात फोन कॉलची संख्या वाढते. या काळात अनेक विद्यार्थी सोडून गेलेले असतात. त्यामुळे जागा रिक्त झालेल्या असतात. अशाच तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या.