Join us  

'एक-दोन वर्षात आर्थिक वृद्धीदर गतिमान होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 2:37 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांचं मत

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या चक्रीय सुस्ती आहे. तथापि, एक-दोन वर्षात आर्थिक वृद्धीदर गतिमान होईल, असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांनी व्यक्त केला आहे.सरकारने अनेक सुधारणात्मक घोषणा केल्या आहेत. आता गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे. वृद्धीदरात चक्रीय सुस्ती आहे. एक-दोन वर्षात निश्चितच अर्थव्यवस्था सुधारेल. १९९१ च्या तुलनेत आजची स्थिती पूर्णत: वेगळी आहे. त्यावेळी बाह्य आघाडीवर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. भारताची आज भक्कम स्थिती आहे. चलन फुगवट्याचा दर कमी झाला असून आणि गंगाजळीत लक्षणीय भर पडली आहे, त्यामुळे भारताची स्थिती भक्कम आहे, असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार २०१९ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर ७ टक्के आणि २०२० मध्ये ७.२ टक्के राहील. आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षात भारताच्या वृद्धीदराबाबतचा अंदाज ७ टक्के केला आहे.बेरोजगारी मोठी समस्या...व्यवस्थापन आयोगाचे माजी चेअरमन असलेले जालान विदेशी सरकारी कर्जाबाबत म्हणाले की, हे कर्ज ५ ते २० वर्षे मुदतीचे असेल, असे सरकारने अगोदरच घोषित केलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या जोखीम कोणत्या? यावर जालान म्हणाले की, बेरोजगारी ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्था