Join us

तेलाच्या किमती ३० डॉलरपर्यंत घसरणार

By admin | Updated: January 12, 2015 23:36 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती या वर्षात प्रति बॅरल ३० डॉलरच्या भावाचा नीचांक गाठतील, असा अंदाज तेलाच्या किमतीचा सातत्याने वेध घेत

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती या वर्षात प्रति बॅरल ३० डॉलरच्या भावाचा नीचांक गाठतील, असा अंदाज तेलाच्या किमतीचा सातत्याने वेध घेत त्याचे विश्लेषण करणाऱ्या ‘गोल्डमन सॅच’ने वर्तविला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने तेलाच्या किमतीमध्ये घसरण नोंदली गेली आहे. ८० डॉलर प्रति बॅरलवरून हा भाव आता ५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरला आहे. एकूण जागतिक परिस्थिती पाहता २०१५ च्या वर्षात तेलाच्या किमतीचा कल हा घसरणीचाच असेल असे भाकित अनेक आंतरराष्ट्रीय आर्थिक सर्वेक्षण कंपन्यांनी वर्तविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गोल्डमन सॅचने वर्तविलेला अंदाज महत्वाचा मानला जात आहे. आॅक्टोबरमध्ये गोल्डमन सॅचने २०१५ च्या पहिल्या महिन्यात तेलाच्या किमतीचा अंदाज ५० डॉलर पर्यंत उतरेल असा अंदाज वर्तविला होता. या नव्या अंदाजानुसार मे महिन्यापर्यंत या किमती ३० डॉलरपर्यंत उतरतील असा अंदाज संस्थेने वर्तविला आहे.तेलाच्या किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी अस्थिरता निर्माण झाली असली तरी या किमती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरू शकतात. परकीय चलनात बचत होतानाच केंद्र सरकारला आता आर्थिक सुधारणा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे मत भारतीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तेल घसरल्यामुळे विकसनशील देशांना फायदाच आहे. (प्रतिनिधी)