Join us  

रिटर्न्स भरणा-यांची संख्या १.२५ कोटींनी वाढविणार, प्राप्तिकर विभागाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:54 AM

यंदा १.२५ कोटी नवे प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे जोडण्याचे निर्देश केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागाला दिले आहेत.

नवी दिल्ली : यंदा १.२५ कोटी नवे प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे जोडण्याचे निर्देश केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागाला दिले आहेत.विभागाला २०१७-१८ या वित्त वर्षात कराधार वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. नवीन विवरणपत्र भरणारे कोण, याची व्याख्या करताना सीबीडीटीने म्हटले की, कायद्याने बंधनकारक असतानाही ज्यांनी गेल्या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले नाही, असे लोक यात गृहीत आहेत. अशा व्यक्ती, संस्था शोधून त्यांना विवरणपत्रे भरण्यास भाग पाडण्याची जबाबदारी प्राप्तिकर विभागावर सोपविण्यात आली आहे. प्राप्तिकर खात्याच्या हैदराबाद आणि पुणे विभागांस सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्स