नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीने वीज उत्पादनात मोठी वाढ नोंदवीत २,८९८ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे.एनटीपीसीने ३० सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहित ४० टक्के नफा मिळविला आहे. कंपनीने मुंबई शेअर बाजारात ही माहिती दिली आहे.मागील वर्षी याच काळात कंपनीला २,०७१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न १८,१७३ कोटी रुपये झाले आहे.मागील वर्षी याच काळात ते १७,२६७ कोटी रुपये होते. एनटीपीसीने म्हटले आहे की, वीज उत्पादनातील वाढीमुळे हा नफा वाढला आहे.
एनटीपीसीचा नफा २,८९८ कोटी रुपये
By admin | Updated: October 29, 2015 21:25 IST