Join us

ईपीएफसाठी आता मिळणार युनिव्हर्सल अकाऊंट नंबर

By admin | Updated: July 25, 2014 23:21 IST

भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत होऊ शकणारी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची योजना भविष्य निर्वाह निधी संचलनाने तयार केली आहे.

नाशिक : भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत होऊ शकणारी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची योजना भविष्य निर्वाह निधी संचलनाने तयार केली आहे. या क्रमांकामुळे खातेधारकांना अनेक सेवा जलदगतीने मिळू शकणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनतर्फे भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी आस्थापना मालकांना विशेष जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती या कार्यालयातर्फे देण्यात आली. 
या अकाऊंट नंबरचे अनेक फायदे असल्याचे सांगण्यात येते. यामुळे खातेदाराच्या वेळेत आणि खर्चात मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणो अनेक खाती असल्यास त्यांचे एकत्रिकरण करणो सोपे होणार आहे. खातेदाराच्या केवायसीसंबंधी माहिती या नंबरशी संलग्न असल्याने फायद्यांसाठी नियोक्त्यावर फारसे अवलंबून राहावे लागणार नाही.
या योजनेची माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संचलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अकाऊंटनंबरसाठी नियोक्त्याला आपल्या कर्मचा:यांकडून केवायसीबाबतची कागदपत्रे कर्मचा:यांकडून घेऊन ती संघटनच्या नॅशनल डाटा सेंटरवर अपलोड करण्याची जबाबदारीही नियोक्त्यावर राहील. (प्रतिनिधी)
 
4या योजनेत नोंदणी करण्यासाठी नियोक्त्याला आपल्या डिजिटल सहीची नोंदणी करावी लागेल.
4आपल्या संगणकप्रणालीत जावा 1.7 व्हजर्न असले पाहिजे.
4ओटीसीपी मोडय़ूलच्या यूएएन मेनूमधून यादी डाऊनलोड करून त्याबाबतची सूचना द्यावी.