Join us  

मेहुल चोकसीच्या कंपनीला एनएसईकडून नोटीस, अन्य ३५ कंपन्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:09 AM

पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळ्याचा सह आरोपी मेहुल चोकसी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीला राष्ट्रीय शेआर बाजाराने (एनएसई) नोटीस पाठविली आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळ्याचा सह आरोपी मेहुल चोकसी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीला राष्ट्रीय शेआर बाजाराने (एनएसई) नोटीस पाठविली आहे. या नोटिशीला कंपनीने समाधानकारक उत्तर न दिल्यास दंडसुद्धा ठोठावला जाऊ शकतो. अन्य ३५ कंपन्यांनाही एनएसईने अशीच नोटीस बजावली आहे.सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाच्या (सेबी) नियमानुसार शेअर बाजाराच्या यादीत प्रविष्ट असलेल्या प्रत्येक कंपनीला त्यांचे तिमाही आर्थिक निकाल विशिष्ट कालमर्यादेत घोषित करावे लागतात. अन्यथा मुदत संपल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत दररोज ५ हजार रुपये दंड आकारला जातो. त्याखेरीज मुदत संपून १५ दिवस लोटल्यावरही निकाल जाहीर न केल्यास कंपनीच्या भागभांडवलांच्या ०.१ टक्का किंवा १ कोटी रुपये, जी रक्कम कमी असेल, त्याचीसुद्धा शेअर बाजाराकडून वसुली केली जाते. गीतांजली ज्वेल्सचे भागभांडवल सध्या २२ ते २४ कोटी रुपये आहे.>‘क्वालिटी’ला नोटीसआइस्क्रीम क्षेत्रातील सुप्रसिद्ध क्वालिटी लिमिटेड या कंपनीलाही एनएसईने याच कारणाने नोटीस बजावली आहे. ‘क्वालिटी वॉल्स’ नावे या कंपनीचे आइस्क्रीम प्रसिद्ध आहे.त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील मोझर बायर लिमिटेड, शिल्पी केबल्स, भारती डिफेन्स, जेव्हीएल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, नॅशनल स्टील अँड अ‍ॅग्रो या कंपन्यांचाही कारवाईत समावेश आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा