Join us

आधार-पॅन जोडणी सरसकट बंधनकारक नाही...

By admin | Updated: July 6, 2017 01:28 IST

पॅन क्रमांकाशी आधार क्रमांकाची जोडणी करणे सरकारने १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ही जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पॅन क्रमांकाशी आधार क्रमांकाची जोडणी करणे सरकारने १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ही जोडणी आवश्यक असेल. त्याचप्रमाणे पॅन कार्ड काढण्यासाठी आधार असणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) यासंबंधीची नियमावली जारी केली आहे. तथापि, पॅन-आधार जोडणी सरसकट बंधनकारक नाही. काही लोकांना यातून वगळण्यातही आले आहे. पॅन-आधार जोडणीतून सवलत देण्यात आलेले घटक पुढील प्रमाणे आहेत. आसाम, जम्मू व काश्मीर आणि मेघालय येथील नागरिकांना पॅन-आधार जोडणी बंधनकारक नाही.प्राप्तिकर कायदा १९६१ अन्वये जी व्यक्ती अनिवासी भारतीय आहे, तिला ही जोडणी बंधनकारक नाही.आदल्या वर्षी जी व्यक्ती ८0 वर्षांची झाली असेल, तिलाही जोडणी बंधनकारक नाही.भारताचे नागरिक नसलेल्यांना पॅन-आधार जोडणी बंधनकारक नाही.वरील गटातील व्यक्तींना पॅन-आधार जोडणी बंधनकारक नसली तरी त्यात आणखी एक मेख आहे. या गटातील ज्या व्यक्तींकडे आधार कार्ड नाही, अशांनाच जोडणीतून सूट देण्यात आली आहे. खरे म्हणजे अशीच सवलत देशाच्या इतर भागांतील व्यक्तींनाही आहे!सीबीडीटीने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर अंशत: सवलत दिली आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, तसेच ते लगेच काढण्याची ज्यांची तयारी नाही, अशांसाठी ही सवलत आहे. आधार अभावी त्यांचे पॅनकार्ड रद्द होणार नाही; तसेच त्यापाठोपाठ होणारे अन्य परिणामही टळतील. या लोकांनी विवरणपत्र भरताना आधार क्रमांक नमूद करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.आधारची वैधता मान्यसरकारने म्हटले की, ज्या लोकांकडे आधार आणि पॅन दोन्ही आहेत, त्यांच्यासाठी जोडणी करणे आवश्यकच आहे. अशा व्यक्ती प्राप्तिकर विवरणपत्र भरत असो अथवा नसो, त्यांना जोडणीतून सवलत मिळणार नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची वैधता मान्य केली होती. विवरणपत्र भरताना तसेच पॅन कार्ड मिळविताना आधार क्रमांक नोंदविण्याचा निर्णयही न्यायालयाने वैध ठरविला होता.