मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणात सोमवारी शेअर बाजार वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९७.६४ अंकांनी वाढून २९,४५९.१४ अंकांवर बंद झाला. ५४.९0 अंकांनी वाढलेल्या निफ्टी नव्या उच्चांकासह ८,९५६.७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी आता १0 हजार अंकांच्या उंबरठ्यावर उभा असून, ४४ अंकांची वाढ मिळविल्यास तो १0 हजार अंकांचा टप्पा ओलांडू शकेल.भांडवली वस्तू, आरोग्य, वित्त आणि ऊर्जा या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २९,५३३.४२ अंकांवर तेजीसह उघडला होता. नंतर मात्र तो २९,५७६.३२ ते २९,२५९.७७ अंकांच्या मध्ये खाली-वर होत राहिला. सत्रअखेरीस २९,४५९.१४ अंकांवर बंद झाला. ९७.६४ अंक अथवा 0.३३ टक्क्याची वाढ त्याने नोंदविली. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ७00 अंकांची वाढ मिळविली आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या व्यापक आधारावरील निफ्टी ५४.९0 अंक अथवा 0.६२ टक्क्याने वाढून ८,९५६.७५ अंकांवर बंद झाला. ही निफ्टीची नवी उच्चांकी पातळी आहे. २९ रोजीचा ८,९५२.३५ अंकांचा बंद हा निफ्टीचा आजवरची सर्वोच्च पातळी होती. ती आज ओलांडली गेली. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,५१0 कंपन्यांचे समभाग वाढले. १,३२८ कंपन्यांचे समभाग घसले. १२१ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ४,६४७.९३ कोटींवर स्थिर राहिली.४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे समभाग वर चढले. १३ कंपन्यांचे समभाग घसरले. वाढीचा लाभ मिळविणाऱ्या कंपन्यांत अॅक्सिस बँक, सिप्ला, भेल, एल अँड टी, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, एनटीपीसी, हिंदाल्को, एचडीएफसी बँक, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचा समावेश आहे.४या उलट आयटीसी, बजाज आॅटो, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, ओएनजीसी, टाटा पॉवर, एम अँड एम आणि गेल यांचे समभाग घसरले.
निफ्टी दहा हजार अंकांच्या उंबरठ्यावर
By admin | Updated: March 3, 2015 00:39 IST