Join us
Daily Top 2Weekly Top 5

वोडाफोनप्रकरणी नवीन पंच नेमणार

By admin | Updated: July 10, 2015 01:00 IST

वोडाफोन कंपनीच्या २० हजार कोटी रुपयांच्या कर वादात न्या. आर.सी. लाहोटी यांनी पंच म्हणून काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्या जागी सरकार

नवी दिल्ली : वोडाफोन कंपनीच्या २० हजार कोटी रुपयांच्या कर वादात न्या. आर.सी. लाहोटी यांनी पंच म्हणून काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्या जागी सरकार लवकरच नवीन पंच नियुक्त करणार आहे.अंतिम निर्णय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना घ्यायचा आहे. सरकारने जून २०१४ मध्ये या प्रकरणासाठी न्या. लाहोटी यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, मे २०१५ मध्ये ते या प्रकरणातून वेगळे झाले. वोडाफोनने आपल्या वतीने कॅनडाचे वेस फार्टियर यांची पंच म्हणून नियुक्ती केली आहे. त्याआधी या प्रकरणी सरकार आणि वोडाफोनदरम्यान तिसऱ्या पंचाबाबत मतैैक्य झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)