Join us  

पीएनबी घोटाळ्याने उभे केले नवे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:22 AM

पीएनबी घोटाळ्यात रोजच्या रोज नवी माहिती पुढे येत आहे. ती माहिती पाहता अनेक नवीन प्रश्न उभे झाले आहेत आणि त्यांची उत्तरे विद्यमान एनडीए सरकारकडून अपेक्षित आहेत.

सोपान पांढरीपांडेनागपूर : पीएनबी घोटाळ्यात रोजच्या रोज नवी माहिती पुढे येत आहे. ती माहिती पाहता अनेक नवीन प्रश्न उभे झाले आहेत आणि त्यांची उत्तरे विद्यमान एनडीए सरकारकडून अपेक्षित आहेत. ही माहिती पुढीलप्रमाणे- गेल्या आठवड्यात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तो २०११ पासून सुरू होता, असा अपप्रचार सुरू झाला. परंतु सीबीआयने लगेच खुलासा करून घोटाळा २०१७मध्ये जारी केलेल्याआठ लेटर आॅफ अंडरस्टँडिंग (एलओयू)मुळे झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा अपप्रचार निकाली निघाला आहे.बंगळुरू येथील गीतांजली जेम्सचे रिलेटर एस.व्ही. हरिप्रसाद यांनी २६ जुलै २०१६ रोजी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)ला ई-मेल पाठवून गीतांजली जेम्सचा मेहूल शहा बँकांकडून हजारो कोटी रुपये कर्ज घेत आहे आणि तो विजय मल्ल्यासारखा विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचे कळवले होते.खरेतर, या प्रकरणाची तेव्हाच सखोल चौकशी व्हायला हवी होती; परंतु पीएमओने ते पत्र मुंबईच्या रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्ला पाठवले. चौकशीनंतर रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्ने ही केस बंद केल्याचे हरिप्रसाद यांना कळवले.१) पीएमओने हे पत्र सीबीआय/ ईडी यासारख्या तपास यंत्रणांना न पाठवता रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्ला का पाठवले? आणि २) रजिस्ट्रार आॅफ कंपनीनेही गंभीर घोटाळ्याचे संकेत देणारे हे पत्र तपास यंत्रणांना न देता केस परस्पर बंद का केली? या प्रश्नांची उत्तरे पीएमओ व रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्कडून अपेक्षित आहेत.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा