Join us

२० रुपयांची नवी नोट येणार

By admin | Updated: July 18, 2014 01:58 IST

रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत २० रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. यावर इन्सेट लेटर ‘ई’चा उल्लेख असणार आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत २० रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. यावर इन्सेट लेटर ‘ई’चा उल्लेख असणार आहे.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘मध्यवर्ती बँक लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात सादर करणार आहे.रुपयाच्या चिन्हासह इन्सेटमध्ये इंग्रजी अक्षर ‘ई’ छापलेले असेल. महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत छापण्यात येणाऱ्या या नोटेवर गव्हर्नर रघुराम जी. राजन यांची स्वाक्षरी असेल.’प्रसिद्धीपत्रकानुसार, या नोटेचे प्रकाशन वर्ष २०१४ असून यापूर्वी या शृंखलेत जारी करण्यात आलेल्या नोटेप्रमाणेच याचे डिझाईन असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)