Join us  

खरेदीच्या पाठबळामुळे निर्देशांकांचे नवे उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:14 AM

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदरामध्ये दुसºया तिमाहीमध्ये वाढ झाली असली, तरी बाजाराने मात्र आर्थिक तूट वाढण्याचीच अधिक धास्ती घेतल्याने गतसप्ताह निराशाजनक राहिला

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीभारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदरामध्ये दुसºया तिमाहीमध्ये वाढ झाली असली, तरी बाजाराने मात्र आर्थिक तूट वाढण्याचीच अधिक धास्ती घेतल्याने गतसप्ताह निराशाजनक राहिला. सुमारे चार वर्षांनंतर निर्देशांकांनी सप्ताहामधील सर्वाधिक घसरण अनुभवली. अमेरिका, तसेच युरोपमधील बाजारही मंदीमध्ये राहिले. आगामी सप्ताहात घेतल्या जाणाºया पतधोरण आढाव्याकडे आता बाजाराची नजर आहे.शेअर बाजारात गतसप्ताह हा पूर्णपणे निराशेचा राहिला. बाजारात सर्वत्र अस्वलाचा संचार दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक खाली येऊनच खुला झाला. सप्ताहामध्ये त्याने ३३ हजारांची पातळी सोडली. सप्ताहामध्ये या निर्देशांकामध्ये ८४६.३० अंशांची घट होऊन तो ३२८३२.९४ वर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजारातही सप्ताह मंदीचाच राहिला. येथील निर्देशांक (निफ्टी) २६७.९० अंशांनी खाली येऊन १०१२१.८० अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्यातही घसरण झालेली दिसून आली. हे निर्देशांक अनुक्रमे १७७.०५ आणि ७.०७ अंशांनी खाली येऊन १६७५७.२७ आणि १८०१७.४८ अंशांवर बंद झाले. आॅगस्ट २०१३ नंतरचा बाजारातील हा सर्वात वाईट सप्ताह ठरला आहे.दुसºया तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर ५.७ टक्क्यांवरून ६.३ टक्के एवढा वाढल्याचे जाहीर झाले आहे. असे असले, तरी बाजाराला मात्र आर्थिक तूट वाढण्याचीच चिंता जास्त सतावताना दिसते आहे. आॅक्टोबर अखेरच प्रस्तावित अर्थसंकल्पीय तुटीपैकी ९६.१ टक्के तूट झाली आहे. त्यामुळे ही तूट वाढली, तर अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची मोठी भीती आहे.परकीय वित्तसंस्थांनी गत सप्ताहामध्ये मोठी विक्री केली. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा विचार करता, या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये १९ हजार ७२८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय कर्जरोख्यांमध्येही या संस्थांनी ५३० कोटी रुपये गुंतविले आहेत.सुमारे एक दशकानंतर भारतीय शेअर बाजाराने कॅनडाला मागे टाकत, आता जगातील आठव्या क्रमांकाचा शेअर बाजार म्हणून स्थान प्राप्त केले आहे. ३० नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य कॅनडाच्या शेअर बाजारापेक्षा अधिक असल्याने कॅनडा भारतापेक्षा मागे पडला आहे.३० नोव्हेंबर २०१७ रोजी भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २.२९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके झाले आहे. तर कॅनडाचे एकूण भांडवलमूल्य २.२८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे. २१ जानेवारी २००८ रोजी भारतीय शेअर बाजारामध्ये झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर प्रथमच भारत कॅनडाच्या वरचढ झाला आहे.या वर्षामध्ये कॅनडामध्ये इंधनविषयक समभागांमध्ये सुमारे १३ टक्के घसरण झाली असून, तेथील निर्देशांक सुमारे २० टक्क्यांनी खाली आले आहेत. याउलट भारतीय बाजार ८०० अब्ज अमेरिकन डॉलरने वाढला आहे.

टॅग्स :निर्देशांक