Join us

निसर्ग व पर्यटनाची छायाचित्र स्पर्धा

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजन

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजन
पनवेल, दि.२५ - लोकमत आणि यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त निसर्ग व पर्यटन स्थळाची छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सानपाडा, सेक्टर ३० येथील बोंगीरवार भवन येथे हौशी व व्यावसायिक असा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.दुपारी २ते ४ या कालावधीत चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून सायंकाळी यमुना सामाजिक शैक्षणि संस्थेचे अध्यक्ष कामगार नेेते महेंद्र घरत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे , पालघर, व रायगड जिल्ह्यातील निसर्ग आणि पर्यटनस्थळे असा स्पर्धेचे विषय आहे. प्रथम व्दितीय आणि तृतीय क्रमांकास अनुक्रमे तीन, दोन आणि एक हजार व दोन उत्तजेनार्थ बक्षिस देण्यात येणार आहेत.स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले छायाचित्र २६ ऑगस्टपर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी ८१०८२८००७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)