नवी दिल्ली : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी एमटीएनएलनेही दरयुद्धात उडी घेतली आहे. कंपनीने ३१९ रुपयांत २८ दिवसांसाठी २ जीबी ३जी डाटा तसेच आपल्या नेटवर्कमध्ये अमर्याद मोफत व्हॉइस कॉलिंगची योजना जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे.३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने ही योजना जाहीर केली. कंपनीचे दिल्ली आणि मुंबईत नेटवर्क आहे. तेथील ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळेल. रिचार्ज केल्यानंतर २८ दिवसांसाठी हा प्लॅन वैध राहील. त्यानंतर तेवढ्याच रकमेचे रिचार्ज करून हा प्लॅन पुढे सुरू ठेवता येईल.
एमटीएनएलकडून ३१९ रुपयांत रोज २ जीबी डाटा
By admin | Updated: April 1, 2017 00:50 IST