Join us  

बहुतांश सरकारी बँका बंदच करायला हव्या! - अनिल सिंघवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:59 AM

बहुतांश सरकारी बँका बंद करण्याची वेळ आली आहे. किमान त्यांचे एकीकरण तरी व्हायला हवे, असे प्रतिपादन आयकॅन इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक संस्थेचे प्रमुख अनिल सिंघवी यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : बहुतांश सरकारी बँका बंद करण्याची वेळ आली आहे. किमान त्यांचे एकीकरण तरी व्हायला हवे, असे प्रतिपादन आयकॅन इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक संस्थेचे प्रमुख अनिल सिंघवी यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.एका मुलाखतीत सिंघवी यांनी सांगितले की, हा एका हिरे व्यापाºयाचा (नीरव मोदी) घोटाळा आहे, असे मला वाटत नाही. अनेक हिरे व्यापारी बँकेला दीर्घ काळापासून लुटत आले असावेत. यापूर्वीही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पंजाब नॅशनल बँक भूतकाळातील आपल्या चुकांपासून काहीही शिकलेली नाही. त्यांच्या जोखीम व्यवस्थापन यंत्रणेत दोष आहेत. त्याचा लोकांनी फायदा घेतला आहे.सिंघवी म्हणाले की, उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील रक्कम प्रचंड मोठी आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एकूण बाजार भांडवल ३० हजार कोटी रुपये आहे आणि बँकेला ११ हजार कोटी रुपयांचा चुना लावला. एकाच घोटाळ्यात बँकेचे एकतृतीयांश बाजार भांडवल लंपास झाले आहे. अनेक वर्षांपासून बँकेचा पैसा लुटला जात होता आणि बँक झोपा घेत होती.विलीन करासिंघवी यांनी सांगितले की, वारंवार उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यातून एक बाब समोर येते की, बँका अनुभवातून काहीच शिकायला तयार नाहीत. शहाण्या बँका दुसºयांच्या चुकांमधूनही शिकतात. आपल्या बँका स्वत:च्याच चुकांमधून काही शिकायला तयार नाहीत. त्याच त्याच चुका बँका वारंवार करीत आहेत. मला तर वाटते की, पंजाब नॅशनल बँकेला तातडीने दुसºया बँकेत विलीन करायला हवे.

टॅग्स :बँक