Join us

मनी पानासाठी - निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव उत्पादकांना फटका : ४५ रुपये किलोचा ठोक भाव

By admin | Updated: September 1, 2014 20:00 IST

मनी पानावर अँकर करता येईल.

मनी पानावर अँकर करता येईल.
-----------------
बुलडाणा : डाळिंबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत. एरव्ही १०० ते १२० रुपये प्रतिकिलो भावाने विकले जाणारे डाळिंब आता ठोक बाजारपेठेत २० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत आल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे.
गत काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा फलोत्पादनाकडे कल वाढला असून, विदर्भात फळांच्या लागवडीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून बाजारात डाळिंबाची आवक वाढली असून, भावही चांगला होता. निर्यातक्षम डाळिंब साधारणपणे १२० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने बाजारपेठेत विकले जात होते; मात्र १५ ऑगस्टपासून डाळिंबावर निर्यातबंदी आल्याने बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे भाव ८० ते ६० रुपयांपर्यंत घसरले होते. आता हे भाव ४५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. निर्यातबंदी नसती, तर डाळिंबाला चांगला भाव मिळाला असता, असे डाळिंब उत्पादकांचे मत आहे.
कोट...
विदर्भात आता डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात होत असून, एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. निर्यातबंदीमुळे डाळिंबाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. सध्या ठोक बाजारपेठेत ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो या भावाने चांगल्या प्रतीचे डाळिंब विकले जात आहेत.
- टी.डी.अंभोरे
जिल्हाध्यक्ष, डाळिंब उत्पादक संघ, बुलडाणा
कोट...
डाळिंब लागवडीत मिळणारा नफा लक्षात घेऊन उत्पादन घेतले; मात्र गत पंधरा दिवसांत डाळिंबाचे भाव उतरले. गत हंगामात २०० रुपये किलोपर्यंत भाव होता. आता मात्र ४५ रुपये किलोने विकावे लागत आहेत.
- ज्ञानेश्वर गायकवाड,
डाळिंब उत्पादक शेतकरी, गिरडा, ता.बुलडाणा
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़