Join us

सुधारित पान १ - महावितरणची सबसिडी होणार बंद!

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

महावितरणची सबसिडी बंद होणार !

महावितरणची सबसिडी बंद होणार !
ग्राहकांवर पडणार बोजा : राज्य सरकारचा विचार
यदु जोशी/मुंबई : औद्योगिक, कृषी आणि ३०० युनिटपर्यंतच्या घरगुती वापरासाठी सध्या महावितरणला देण्यात येत असलेली असलेली दरमहा ७०६ कोटी रुपयांची सबसिडी बंद करण्याचा भाजपा सरकार गांभीर्याने विचार करीत असून, ही सबसिडी बंद झाली, तर या ग्राहकांवर वाढीव आर्थिक बोजा पडणार आहे.
मागील आघाडी सरकारने १४ एप्रिल रोजी २० टक्के वीजदरवाढ केली होती. मात्र ही दरवाढ अन्यायकारक असल्याची ओरड झाल्यानंतर वाढीव २० टक्क्यांच्या फरकासाठी महावितरणला दरमहा ७०६ कोटी रुपयांची सबसिडी सुरू केली होती. त्यासाठी अर्थसंकल्पात येत्या मार्चपर्यंत ८ हजार ४०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र वित्त विभागाने अलिकडेच केलेल्या सादरीकरणात ही सबसिडी पुढे सुरू ठेवू नये, अशी शिफारस केली होती. त्यामुळे सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. सरकारने ही सबसिडी बंद केली तर ग्राहकांना २० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागेल. शिवाय, नियमितपणे होणारी वीज दरवाढ वेगळीच. यावर सरकारी सुत्रांचे म्हणणे असे की, ही सबसिडी केवळ एक वर्षासाठी देण्यात आली होती.
--------------------------------------------------
क्षमता वाढवा
महाजेनकोने वीजनिर्मिती क्षमता वाढविली तर बाहेरून महागडी वीज घेण्याचे प्रमाण कमी होईल. वीज निर्मितीसाठी दर्जेदार कोळसा उपलब्ध करून देण्याची हमी आता केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती वाढून स्वस्तात वीज तयार होईल आणि ग्राहकांवरील बोजा कमी करता येईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे.
--------------------------------------------------