Join us  

सोन्या-चांदीच्या भावात अल्प वाढ

By admin | Published: October 30, 2014 1:34 AM

दागिने विक्रेत्यांकडून झालेली खरेदी यामुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीचा बाजार बुधवारी अल्प प्रमाणात होईना पण तेजीत राहिला.

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील मजबुती आणि लगAसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी दागिने विक्रेत्यांकडून झालेली खरेदी यामुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीचा बाजार बुधवारी अल्प प्रमाणात होईना पण तेजीत राहिला. सोने 10 रुपयांच्या वाढीसह 27,500 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव 150 रुपयांनी वाढून 38,400 रुपये किलो झाला. 
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, लगAसराईच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी दागिने विक्रेत्यांनी बाजारात खरेदी केली. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडून वित्तीय धोरणाचा आढावा जाहीर होण्याआधी जागतिक बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले
आहे. 
याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून आला. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वर चढल्या.
भारतातील किमती निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा:या सिंगापूर येथील बाजारात सोन्याच्या किमतीत अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. तेथे सोने प्रतिऔंस 1,230.27 डॉलर झाले आहे. भारतातीतील किमतीही त्याच प्रमाणात वाढल्या आहेत. 
दिल्लीत 99.9 टक्के शुद्धता आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 10 रुपयांनी वाढून अनुक्रमे 27,500 रुपये तोळा आणि 27,300 रुपये तोळा झाला. आठ ग्रामच्या गिन्नीचा भाव 24,200 रुपये राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)