Join us

इम्फाळच्या अधिकारी, पदाधिकार्‍यांची मनपाला भेट घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापौरांसोबत चर्चा

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

अकोला : मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रदीर्घ चर्चा केली. विदर्भातील शहरांचा अभ्यास दौरा करण्याच्या निमित्ताने इम्फाळ मनपाचे पदाधिकारी, अधिकारी शुक्रवारी अकोल्यात दाखल झाले होते.

विदर्भातील अमरावती, अकोला, शेगाव आदी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख यांची भेट घेऊन इम्फाळच्या शिष्टमंडळाने घनकचर्‍याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. यामध्ये डब्ल्यू. बकीमचंद्र सिंग, कार्यकारी अधिकारी संजोबा सिंग, सहाय्यक अभियंता वाय. कुलचंद्रसिंग, क्षेत्रीय अधिकारी उमेशसिंग, एम.सुवासचंद्रा, एच. नूतनसिंग यांचा समावेश होता. यावेळी नगरसेवक बाळ टाले, सतीश ढगे, प्रतुल हातवळणे, संदीप देशमुख, आशिष पवित्रकार उपस्थित होते.

फोटो-१३सीटीसीएल-३५--