Join us

तीन सत्रंच्या तेजीनंतर बाजार कोसळला

By admin | Updated: November 26, 2014 02:35 IST

नफा वसुली आणि पी-नोटस् संबंधीच्या नियमांबाबत चिंता यामुळे मंगळवारी शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली.

आपटी : सेन्सेक्स, निफ्टी सहा आठवडय़ांच्या नीचांकावर; बाजारात नफा वसुलीला उत
मुंबई : नफा वसुली आणि पी-नोटस् संबंधीच्या नियमांबाबत चिंता यामुळे मंगळवारी शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 161 अंकांनी कोसळून 28,338.05 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सीएनएक्स निफ्टी 67 अंकांनी कोसळून 8,463.10 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने हा आठवडय़ांचा नीचांक गाठला आहे. 
रिअल्टी, एफएमसीजी, ऊर्जा, धातू, टिकाऊ ग्राहकवस्तू, बँकिंग, भांडवली वस्तू आणि वाहन या क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जोर दिसून आला. 
बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीने 28,520.76 अंकांवर उघडला होता. नंतर तो आणखी वर चढून 28,541.22 अंकांवर पोहोचला. तथापि, तेजीचे वातावरण अल्पकालीन ठरले. बाजारात विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स झपाटय़ाने उताराला लागला. एका क्षणी तो 28,217.50 अंकांर्पयत खाली आला होता. सत्रच्या अखेरीस 161.49 अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स 28,338.05 अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत सेन्सेक्सची ही घसरण 0.57 टक्के आहे. 16 ऑक्टोबरनंतरची हा सर्वात मोठी एकदिवसीय घसरण आहे. त्या दिवशी सेन्सेक्स 350 अंकांनी कोसळला होता. आधीच्या सलग तीन दिवसांत सेन्सेक्स तेजीत होता. 
 
च्सेन्सेक्समधील 30 पैकी 15 कंपन्यांचे समभाग वर चढले. उरलेले 15 समभाग कोसळले. आयटीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एल अँड टी, टाटा पॉवर, मारुती, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो यांना घसरणीचा फटका बसला. या उलट भेल, एचयूएल, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लँब, भारती एअरटेल, सिप्ला आणि एचडीएफसी यांचे शेअर्स नफ्यात राहिले. 
 
च्स्मॉल-कॅप आणि मीड-कॅप निर्देशांक अनुक्रमे 2.32 टक्के आणि 1.43 टक्के कोसळले. किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात विक्रीचा मारा केल्यामुळे त्यांना फटका बसला. 
च्बाजाराचा एकूण विस्तार नकारात्मक टप्प्यात राहिला. 2,173 कंपन्यांचे समभाग कोसळले. 823 कंपन्यांचे समभाग वर चढले. 90 कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल 7,291.24 कोटी झाली. काल ती 3,411.18 कोटी रुपये होती.