Join us

बालकामगारविरोधी कायद्याला खो

By admin | Updated: May 6, 2014 16:26 IST

शिवर : बालकामगारविरोधी कायदा अस्तित्वात असतानादेखील हा कायदा राबविणार्‍या यंत्रणेचा काहीच धाक नसल्याने बालकामगारांचे प्रमाण वाढल्याचे सर्वत्र दिसत आहे. विटभ˜्या,खासगी उद्योग, हॉटेल्स आणि कारखान्यामध्ये बालकामगार सर्रास काम करताना दिसत आहेत. केंद्र शासनाचा बालकामगार प्रतिबंध कायदा तयार करण्यात आला; पण त्याची रीतसर अंमलबजावणी संबंधित विभागाद्वारे अधिकारी करीत नसल्याने दिवसेंदिवस बालकामगारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. अशा बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना कामावर ठेवणार्‍या दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

बालकामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १४ वर्षे वयोगटाखालील मुला-मुलींना कामावर घेणे कायद्याने गुन्हा ठरतो. शाळांच्या परीक्षा आटोपल्या, की अनेक विद्यार्थी छोट्या-मोठ्या कामावर जाण्याच्या बेतात असतात. घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावता यावा, तर कुणी आपले शौक व सोयीसाठी पैसा मिळावा या उद्देशाने कामावर जातात. कमी मजुरीमध्ये लहान मुलांना कामावर ठेवत कंत्राटदार, दुकानदार यांचा फायदा घेतात. शासनाने बालकामगार प्रतिबंधक कायदा तयार केला; मात्र अधिकार्‍यांनी त्याला कचर्‍याची टोपली दाखविली आहे. ज्या विभागावर, अधिकार्‍यावर, कर्मचार्‍यावर या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकली आहे, तेच मात्र याकडे दुर्लक्ष करीत थंड कुलरच्या हवेत झोपा काढत आहेत. वीटभ˜ीवर तर भर उन्हात लहान मुले काम करताना दिसतात; मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकार्‍याने बालमजुराची चौकशी केली नाही. कायदा कठोर करण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधण्याचे काम अधिकारी करीत असल्याने कायद्याची ऐशीतैशी होत आहे. शिवर व शिवणी एमआयडीसी परिसरातही हेच चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
---------
कोट
१४ वर्षे वयोगटातील बालकामगारांना कामावर ठेवल्याप्र्रकरणी संबंधितांविर बालकामगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई होऊ शकते.
-संजय सेंगर, बालकल्याण समिती अध्यक्ष, अकोला