Join us  

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

By admin | Published: August 27, 2014 11:58 PM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या सोमनाथनगर (त्र्यंबकेश्वर) येथील शाळेला अद्यापही शिक्षक न दिल्याने अखेर ग्रामस्थांनीच त्या शाळेला कुलूप लावले. कुलूप लावल्यानंतर दुसर्‍या दिवशीही शिक्षक न आल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी शाळेबाहेर दिवसभर शिक्षकाची वाट पाहिली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या सोमनाथनगर (त्र्यंबकेश्वर) येथील शाळेला अद्यापही शिक्षक न दिल्याने अखेर ग्रामस्थांनीच त्या शाळेला कुलूप लावले. कुलूप लावल्यानंतर दुसर्‍या दिवशीही शिक्षक न आल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी शाळेबाहेर दिवसभर शिक्षकाची वाट पाहिली. याबाबत सोमनाथनगर येथील रहिवाशांनी त्र्यंबकच्या गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले आो. त्यात म्हटले आहे की, ज्ञानेश्वर नंदनवार या शिक्षकाऐवजी बदली शिक्षक मिळावा यासाठी झालेला ग्रामपंचायत ठराव पारीत करण्यात आला होता. तशी मागणीही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने शेवटी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. शाळेला यापूर्वी दिलेले शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने त्यांच्या जागी दुसरा शिक्षक नेमावा, ही ग्रामस्थांची मागणी होती. शाळेला कायमस्वरूपी शिक्षक नेमावा अशी मागणीही त्या निवेदनात करण्यात आली होती. या निवेदनावर चिंतामण बेंडकोळी, चंदर बेंडकोळी, पंढरीनाथ बेंडकोळी, नामदेव नळवाडे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत. फोटो स्कॅनिंगला.