Join us

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून वाढून २.५ लाख रुपये

By admin | Updated: July 10, 2014 13:04 IST

सर्वसामान्यांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांनी वाढवून २.५ लाख रुपये केली आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १० - सर्वसामान्यांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांनी वाढवून २.५ लाख रुपये केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा २.५ लाख रुपयांवरून वाढवून ३ लाख रुपये केली आहे. तसेच ८० सी अंतर्गत करता येणारी करबचतीसाठी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या एक लाख रुपयांवरुन वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे. गृहकर्जावरील व्याजावरील करसवलत सध्याच्या दीड लाख रुपयांवरुन दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
त्याचवेळी पीपीएफमधली गुंतवणुकीची मर्यादाही एक लाख रुपयांवरून वाढवून दीड लाख रुपये केली असल्याने जनतेने पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी अशी इच्छा सरकारने बजेटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या तरतुदीमुळे सर्वसामान्य गुंतवणुकीच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार रुपये वाचवता येणार आहेत.