दिवसभर वीज गुल
By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST
शहरातील काही भागांत दिवसभर वीज गुल
दिवसभर वीज गुल
शहरातील काही भागांत दिवसभर वीज गुल औरंगाबाद : शहरात वीजपुरवठा करणार्या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी शुक्रवारी शहरातील सातारा, दिशानगरी, इंदिरानगर, शहा कॉलनी व छावणी परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सातारा परिसरातील दिशानगरी फिडरवरील ११ के.व्ही. वीज वाहिन्या बदलण्यात आल्या. यामुळे पेशवेनगर, सातारा गाव, हायकोर्ट कॉलनी, समर्थनगर, रेणुकामाता मंदिर, लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसर व बीड बायपास या परिसरातील विद्युत पुरवठा दिवसभर खंडित झाला होता. याशिवाय होलिक्रॉस फिडरवरील कर्णपुरा, इन्कम टॅक्स कॉलनी, निजाम बंगला, होलिक्रॉस स्कूल, महावीर चौक, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन परिसर, पदमपुरा या परिसरात अनेक ठिकाणचे फिडर बदलण्यात आले. तसेच इंदिरानगर फिडरवरील उल्कानगरी, आदित्यनगर, कासलीवाल विश्व, चंद्रगुप्तनगरी, श्रीरामनगर, अशोकनगर, हनुमान चौक, प्राईट इग्मा, मोरेश्वर हौसिंग सोसायटी, मेहरनगर, गारखेडा परिसर, शहा कॉलनी फिडरवरील वाडेकर कॉर्नर, विजयनगर, शहा हाऊसिंग सोसायटी, छत्रपतीनगर, स्वप्ननगरी या परिसरात विद्युत वाहिन्यांची तपासणी तसेच तारेवर येणार्या फांद्या तोडण्यात आल्या. सायंकाळी ५ वाजेनंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.