Join us  

सेल्फीप्रेमींसाठी तब्बल 16 MP कॅमेरा असलेला Gionee A1 लॉन्च

By admin | Published: March 22, 2017 6:12 AM

स्मार्टफोन निर्माती कंपनी Gionee ने सेल्फीप्रेमींसाठी Gionee A1 हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - स्मार्टफोन निर्माती कंपनी  Gionee ने सेल्फीप्रेमींसाठी  Gionee A1  हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. 31 मार्चपासून या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 
 
बार्सिलोनामध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये कंपनीने Gionee A1 Plus सोबत  Gionee A1  लॉन्च केला होता.  चांगला बॅटरी बॅकअप आणि सेल्फीसाठी हा फोन ओळखला जाईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.  फोनमध्ये 4010 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून तब्बल 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  दोन तासात फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 
 
Gionee A1  मध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमे-याव्यतिरिक्त 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. अॅंन्ड्रॉइड 7.0 Nougat सपोर्ट असणारा हा ड्यूअल सीम स्मार्टफोन आहे. 5 इंच फुल-एचडी (1080x1920 पिक्सल) डिस्प्लेसह मीडियाटेक हीलियो पी10 चिपसेट फोनमध्ये आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी  256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.  फोनची किंमत आणि फोन ग्राहकांपर्यंत कधी पोहोचेल याबाबत मात्र कंपनीने खुलासा केला नाही.