Join us  

मागील दोन वर्षांचे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्चपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:54 AM

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७ -१८ चा शेवटचा महिना जवळ आला आहे. या वर्षाच्या मार्च अखेरीस करदात्याने काय काळजी घेतली पाहिजे?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७ -१८ चा शेवटचा महिना जवळ आला आहे. या वर्षाच्या मार्च अखेरीस करदात्याने काय काळजी घेतली पाहिजे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, मार्च महिना सर्व करदात्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. आपल्या देशात, एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष सर्व कर कायद्यासाठी लागू आहे. म्हणूनच एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी खात्याची वह्या पुस्तके तयार केली जातात. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी आयकर रिटर्न्स भरण्यासंदर्भात काही सक्तीचे नियम आले आहेत.अर्जुन : कृष्णा, आयकर रिटर्न कोणाला भरावयाचे असतात?कृष्ण : अर्जुना, १) ज्यांचे वैयक्तीक किंवा एचयुएफ करदात्यांचे वार्षिक उत्पन्न नियोजीत मयार्देपेक्षा जास्त आहे. २) कंपनी, एलएलपी, पार्टनरशिप फर्म, कितीही उत्पन्न असले तरी. ३) संस्था राजनैतीक दल ज्यांचे सूट घेण्या अगोदरचेउत्पन्न बेसिक कर निर्धारन रकमेपेक्षा जास्त असेल तर. तसेच खालील या व्यक्तींनी आयकर रिटर्न दाखल करावे. १) उत्पन्न बेसिककर निर्धारन रकमेपेक्षा कमी परंतुमोठी रक्कम बँकेत जमा केलीअसेल. २) ज्या व्यक्तीने मोठ्या रकमेचे व्यवहार केले असतील तर.अर्जुन : कृष्णा, २०१५-१६ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची वेळ काय होती?कृष्ण : अर्जुना, वर्ष २०१५-१६ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ५ आॅगस्ट २०१६ होती. ज्यांना आॅडिट लागू होत नाही तसेच टॅक्स आॅडिट लागू असणाºयासाठी १७ आॅक्टोंबर २०१६ होती. करदाते रिटर्न ३१ मार्च २०१८ पर्यंत दाखल करू शकतात. परंतु उशिरा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये तोटा असेल तर तो पुढील वर्षात घेता येत नाही. व कर भरण्यास येत असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल.अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वेळ काय असेल?कृष्ण : अर्जुना, वर्ष २०१६-१७ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ५ आॅगस्ट २०१७होती ज्यांना आॅडिट लागू होत नाही तसेच टॅक्स आॅडिट लागू असणा-यासाठी ७ नोव्हेंबर २०१७ होती. करदाते उशिरा रिटर्न ३१ मार्च २०१८ पर्यंंत दाखल करू शकतात. परंतु उशिरा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये तोटा असेल तर तो पुढील वर्षात घेता येत नाही. व कर भरण्यास येत असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल. करदाता वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्न ३१ मार्च २०१८ नंतर दाखल करू शकणार नाही.अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या आयकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वेळ काय असेल?कृष्ण : अर्जुना, वर्ष २०१७-१८ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतीम तारीख ३१ जूलै २०१८ आहे. ज्यांना आॅडिट लागू होत नाही तसेच टॅक्स आॅडिट लागू असणाठयासाठी ३० सप्टेंबर २०१८ आहे. जर करदात्याने आयकर विवरणपत्र दाखल केले नाही तर त्यावर लेट फीस लागेल. करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखाच्या खाली असेल तर त्यावर १ हजार रुपये लेट फीस भरावी लागेल. आणि ५ लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्याला ५ हजार रुपये लेट फीस भरावी लागेल. आणि आयकर विवरण पत्र ३१ डिसेंबर २०१८ नंतर दाखल केले तर त्यास १० हजार रुपये लेट फीस भरावी लागेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, ‘शिस्त’ हे माणसाला जिवनात यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. आणि शासनाने आणलेले हे उपाय आर्थिक शिस्त लावण्यासाठी मदत करतील. करदात्यांनी या बदलांचे स्वागत केले पाहिजे. आयकर विवरण पत्र वेळेवर दाखल करून त्याचे योगदान दिले पाहिजे. वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्स