Join us  

जिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:58 AM

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९ रुपयांचा सर्वाधिक कमी किमतीचा डाटा प्लॅन आणल्यामुळे भारतातील दूरसंचार बाजार पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचा ‘प्रति वापरकर्ता महसूल’ (एआरपीयू) आधीच घसरत आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९ रुपयांचा सर्वाधिक कमी किमतीचा डाटा प्लॅन आणल्यामुळे भारतातील दूरसंचार बाजार पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचा ‘प्रति वापरकर्ता महसूल’ (एआरपीयू) आधीच घसरत आहे.आता जिओच्या नव्या प्लॅनमुळे त्यांना जबर झटका बसणार आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकायचे असेल, तर कंपन्यांनाही जिओप्रमाणे कमी खर्चाचे ‘व्हीओएलटीई’ ४जी तंत्रज्ञान आणावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.जिओद्वारे ४९ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना आजीवन मोफत व्हॉइस कॉल, तसेच २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी ४ जी डाटा मिळणार आहे. या प्लॅनमुळे एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांचे कनिष्ठ स्तरातील २जी ग्राहक मोठ्या संख्येने व्हीओएलटीई ४ जी सेवेकडे वळतील, असा अंदाज आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या दूरसंचार कंपन्यांना त्यामुळे मोठा आघात सहन करावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.अमेरिकास्थित ब्रोकरेज संस्था जेपी मॉर्गनने म्हटले की, भारतात अजूनही ७0 टक्के ग्राहक २जी फिचर फोन वापरतात. दूरसंचार क्षेत्रातील एकूण महसुलापैकी ५0 टक्के महसूल आजही २जी क्षेत्रातून येतो. प्रीपेड ग्राहकांचा एआरपीयू ७0 रुपये आहे. त्यातील फिचरफोनचा व्हॉइस एआरपीयू ५0 ते ६0 रुपये आहे.टिकाव लागणे अशक्यगेल्या तिमाहीत रिलायन्स जिओसह सर्वच दूरसंचार कंपन्यांची कामगिरी दयनीय राहिली. त्यातच जिओने लक्षावधी २जी फिचर फोन विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधीच कमजोर स्थितीत असलेल्या दूरसंचार कंपन्यांना याचा जबर फटका बसेल.गेल्या तिमाहीत रिलायन्स जिओसह सर्वच दूरसंचार कंपन्यांची कामगिरी दयनीय राहिली. त्यातच जिओने लक्षावधी २जी फिचर फोन विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधीच कमजोर स्थितीत असलेल्या दूरसंचार कंपन्यांना याचा जबर फटका बसेल.एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या पारंपरिक कंपन्यांना २जी आणि ३जी सेवेचा त्याग करून व्हीओएलटीई ४जी तंत्रज्ञान अंगीकारावे लागेल. २जी व ३जी तंत्रज्ञानास चिकटून राहिल्यास, या कंपन्यांचा स्पर्धेत टिकाव लागणे अशक्य आहे. कारण २जी व ३जी तंत्रज्ञान व्हीओएलटीई ४जी तंत्रज्ञानाच्या तुलनेत खूपच महाग आहे.

टॅग्स :जिओएअरटेलव्होडाफोन