Join us  

‘जेएनपीटी’वरील ‘सेझ’मुळे सव्वा लाख नव्या नोक-या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:23 AM

मुंबईच्या जेएनपीटी बंदराचा दोन हजार कोटी रुपये खर्च करून विस्तार करण्याबरोबरच हे बंदर खास आर्थिक विभाग (सेझ) म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय जहाज उद्योगमंत्री

सुशांत कुंकळयेकरमडगाव : मुंबईच्या जेएनपीटी बंदराचा दोन हजार कोटी रुपये खर्च करून विस्तार करण्याबरोबरच हे बंदर खास आर्थिक विभाग (सेझ) म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय जहाज उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली. जेएनपीटीच्या खास आर्थिक विभागामुळे सव्वा लाख नवीन नोकºया तयार होतील. देशात सहा नवीन बंदरे विकसित करण्यात येणार असून, महाराष्ट्रातील वढण बंदराचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले.दक्षिण गोव्यातील बाणावली येथे जहाज उद्योग मंत्रालयाच्या सहामाही आढावा बैठकीची सांगता झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, देशातील महत्त्वाची बंदरे जेएनपीटीला जोडून जलमार्गाद्वारे उद्योग वाढवायचा आहे. जेएनपीटीच्या खास आर्थिक विभागामुळे सव्वा लाख नवीन नोकºया तयार होतील. मंत्रालयाच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेखाली या बंदरावर मल्टीस्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारले जाईल. जेएनपीटी ‘रो-रो’ मालवाहतुकीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे.गोवा-मुंबई क्रूझ डिसेंबरपासूनगोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारी गोवा-मुंबई क्रूझ सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर ‘रो-रो’ सेवेने जोडला जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.भाऊचा धक्का, मांडवा, नेरळ व नवी मुंबई जलमार्गाने जोडून वाहनांची वाहतूक बोटीतून ‘रो-रो’ सेवेद्वारे केली जाणार असून, त्यामुळे कित्येक तासांचा प्रवास काही मिनिटांत होऊ शकेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :नितीन गडकरी