Join us  

जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 3:51 AM

स्लॉट अन्य कंपन्यांना; विमानफेऱ्या पुन्हा मिळण्याबाबत साशंकता

मुंबई : जेट एअरवेजचे स्लॉट (मार्ग) इतर विमान कंपन्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे जेट एअरवेजमध्ये पैसे गुंतविण्यास एतिहाद एअरवेज, टीपीजी कॅपिटल व इंडिगो एअर या कंपन्या अनुत्सुक आहेत. परिणामी, बंद पडलेल्या जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन अडचणीत आले आहे.सरकार जेटमध्ये पैसे गुंतवण्यास ते अनुत्सुक आहे. जेट एअरवेजवरील कर्ज १०,००० कोटींपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारतीय बँकांचे ७,३५१ कोटी व ३ विदेशी बँकांचे (माशरेक बँक- १,४०० कोटी, एचएसबीसी- ९१० कोटी व वित्तसंस्थेचे ७०० कोटी) ३,०१० कोटी आहेत. भारतीय बँकांमध्ये स्टेट बँक (१,९५८ कोटी), पंजाब नॅशनल बँक (१,७४६ कोटी), येस बँक (८६९ कोटी), आयडीबीआय (७५२ कोटी), कॅनरा बँक (७१८ कोटी), आयसीआयसीआय बँक (५४५ कोटी), बँक आॅफ इंडिया (२६६ कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक (२१२ कोटी) व सिंडिकेट बँक (१८५ कोटी) यांचा समावेश आहे.इंडिगो बनली सर्वात मोठी कंपनीजेट बंद पडल्यामुळे इंडिगो एअर ही भारतातील सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी बनली आहे. इंडिगोचा बाजार हिस्सा- ४६.९० टक्के आहे. त्यानंतर स्पाईस जेट- १३.६० टक्के, एअर इंडिया- १३.१० टक्के, गो एअर- ९.९० टक्के, एअर आशिया- ५.९० टक्के व विस्तारा एअरवेज- ४.२० टक्के यांचा नंबर लागतो.

टॅग्स :जेट एअरवेज