Join us  

जेटली कॅनडात; आर्थिक करारांचा घेणार आढावा

By admin | Published: October 04, 2016 4:03 AM

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचे तीन दिवसांच्या कॅनडा दौऱ्यासाठी सोमवारी येथे आगमन झाले. या दौऱ्यात ते कॅनडासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा

टोरांटो : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचे तीन दिवसांच्या कॅनडा दौऱ्यासाठी सोमवारी येथे आगमन झाले. या दौऱ्यात ते कॅनडासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा, तसेच प्रस्तावित सर्वंकष आर्थिक भागीदारी कराराच्या प्रगतीचा आढावा घेतील. जेटली यांचा हा विदेश दौरा सात दिवसांचा आहे. कॅनडाचा दौरा आटोपून ते अमेरिकेला जाणार आहेत. कॅनडामध्ये ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. प्रस्तावित सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराबरोबरच (सीईपीए), ते विदेशी गुंतवणूक आणि सुरक्षा कराराचाही (एफआयपीए) आढावा घेणार आहे. विदेशी गुंतवणूकदारांसोबत ते एक बैठकही घेणार आहे. अमेरिका दौऱ्यात जेटली जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकांना हजेरी लावतील. तीन दिवसांची ही बैठक ७ आॅक्टोबरला वॉशिंगटनमध्ये सुरू होणार आहे. वाणिज्य आणि व्यापारमंत्री निर्मला सीतारामन या गेल्याच आठवड्यात कॅनडाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यास दोन्ही देश बांधील असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)