जैन बॅटरी गोडावूनची तपासणी; सव्वा लाखांचा दंड वसूल एलबीटी विभागाची कारवाई
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
अकोला : स्थानिक संस्था कर (एलबीटी) जमा न करण्याचा प्रकार जैन बॅटरी संचालकांच्या अंगलट आला. मनपाच्या एलबीटी विभागाने लकडगंजस्थित जैन बॅटरी गोडावूनची तपासणी करीत १ लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी केली.
जैन बॅटरी गोडावूनची तपासणी; सव्वा लाखांचा दंड वसूल एलबीटी विभागाची कारवाई
अकोला : स्थानिक संस्था कर (एलबीटी) जमा न करण्याचा प्रकार जैन बॅटरी संचालकांच्या अंगलट आला. मनपाच्या एलबीटी विभागाने लकडगंजस्थित जैन बॅटरी गोडावूनची तपासणी करीत १ लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी केली.लकडगंज परिसरात जैन बॅटरी संचालकांचे गोडावून आहे. संचालक प्रामाणिकपणे एलबीटी जमा करीत नसल्याचा प्रकार स्थानिक संस्था कर विभागाच्या निदर्शनास आला. त्यानुषंगाने एलबीटीच्या कर्मचार्यांनी लकडगंजस्थित गोडावूनची तपासणी केली असता, या ठिकाणी ३३६ बॅटरी आढळून आल्या. बाजारभावानुसार संपूर्ण बॅटरीची किंमत ७ लाख ३९ हजार २०० रुपये होती. त्यानुसार संबधिंत व्यावसायिकाला १ लाख २१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.