Join us

चालू वर्षात करसंकलनाचे लक्ष्य गाठणो सहज शक्य

By admin | Updated: July 21, 2014 23:42 IST

चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात ठेवलेले करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणो सरकारला सहज शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात ठेवलेले करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणो सरकारला सहज शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारला हे लक्ष्य गाठणो शक्य झाले नव्हते. चालू आर्थिक वर्षात 13 लाख 64 हजार कोटी रुपयांचे करसंकलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यावर्षी हे लक्ष्य गाठले जाईल एवढेच नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक कर जमा करणो सरकारला शक्य होईल, असा दावा जेटली यांनी आज केला. प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्त, मुख्य महासंचालक आणि महासंचालकांच्या तिसाव्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. विश्वासार्हता हीच या विभागाची मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच या विभागातील अधिका:यांकडून उच्च नैतिक मूल्यांची अपेक्षा ठेवली जाते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
गेल्या वर्षी अर्थसंकल्पात करसंकलनाचे उद्दिष्ट 12 लाख 35 हजार कोटी रुपये ठेवण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात 77 हजार कोटी रुपयांनी हे लक्ष्य गाठण्यात अपयश आले होते. अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याने अप्रत्यक्ष कर अपेक्षित ठेवलेल्या रकमेइतके जमा होण्याबाबत साशंकता असली, तरी प्राप्तिकराच्या बाबतीत मात्र ही रक्कम उद्दिष्टापेक्षा अधिक राहील, असा अंदाज आहे.
अर्थसंकल्पातील अप्रत्यक्ष कराचे उद्दिष्ठ गाठणो कठीण असल्याचे वक्तव्य अर्थमंत्रलयातील वरिष्ठ अधिका:याने नुकतेच केले होते. या पाश्र्वभूमीवर  जेटली यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते. केंद्रीय अबकारी व सीमा शुल्क विभागाचे अध्यक्ष जे. एम. शांतीसुंदरम् म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कराचे जे संकलन झाले, ते त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या केवळ 5 टक्के अधिक होते. वित्तमंत्र्यांनी गेल्या आर्थिक वर्षासाठी जे लक्ष्य निर्धारित केले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात झालेले कर संकलन हे कमी होते. या पाश्र्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात जे लक्ष्य दिले आहे, ते गाठायचे असेल तर किमान 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)