Join us

बीएसई गुजरातमध्ये उभारणार इंटरनॅशनल एक्स्चेंज

By admin | Updated: January 12, 2015 15:20 IST

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजतर्फे गुजरातमध्ये इंटरनॅशनल एक्स्चेंज उभारण्यात येणार असून त्यासाठी दीडशे कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजतर्फे गुजरातमध्ये इंटरनॅशनल एक्स्चेंज उभारण्यात येणार असून त्यासाठी दीडशे कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. गुजरात सरकारद्वारा 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' म्हणून विकसित करण्यात येणा-या 'गिफ्ट सिटी' ( गुजरात इंटरनॅशनल फायनॅन्स टेक-सिटी) येथे हे एक्स्चेंज उभारण्यात येणार आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूदारांना शेअर बाजारात ट्रेडिंग करणे सुलभ व्हावे यासाठी या एक्स्जेंचद्वारे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'व्हायब्रंट गुजरात परिषदे'दरम्यान 
बीएसई व 'गिफ्ट' दरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.  
या एक्स्चेंजमुळे भारत आंतरराष्ट्रीय बाजारात इतर एक्स्चेंजशी स्पर्धा करण्यास सक्षम होईल. त्यामुळे हाँगकाँग, सिंगापूर, दुबई आणि लंडनप्रमाणे  'गिफ्ट' हे आंतरराष्ट्रीय बाजारातील अग्रगण्य वित्तीय संस्था 
बनू शकेल, असे 'बीएसई'चे व्यवस्थआपकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले.