Join us  

इंधनदर कपातीमुळे थांबेल व्याज दरवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:15 AM

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात दिलासा शक्य

मुंबई : चांगला पाऊस व खनिज तेलाच्या नियंत्रणात येणाऱ्या किमती यामुळे महागाई दर कमी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात घोषित होणाºया रेपो दरात वाढ न करता ते स्थिर ठेवण्याची शक्यता आहे. हा कर्जदारांसाठी दिलासा असेल.खनिज तेलाच्या दरवाढीमुळे मार्चपासून इंधनाच्या दरात वाढ सुरू झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्याच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत उद्योग जगताची मागणी असतानाही व्याज दर कमी केले नाहीत. त्यानंतर मे महिन्यात इंधनाचे दर उच्चांकावर गेल्याने जून महिन्यात चार वर्षांनी पहिल्यांदाच रेपो दरात वाढ करण्यात आली. आता ३१ जुलैपासून बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक होत आहे. त्यामध्ये पुन्हा व्याज दर वाढीचे संकेत होते. पण दहा दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे सामान्यांना हलका दिलासा मिळण्याची शक्यता आहे.इंधनाच्या वाढत्या दरांमुळे महागाई दर ५ टक्क्यांच्यावर राहण्याचा अंदाज असल्याने रेपो दरात पुन्हा अर्धा टक्का वाढ करण्यासंदर्भात यापूर्वीच्या बैठकीत चर्चा झाली होती. पण मागील दहा दिवसांत खनिज तेलाचे दर बॅरलमागे जवळपास ५ डॉलरने (जवळपास २ रुपये प्रति लिटर) घसरले आहेत. खनिज तेल येत्या काळात आणखी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. मान्सूनसुद्धा समाधानकारक आहे. यामुळे धान्याचे दर यंदा स्थिर असतील, अशी शक्यता आहे. यामुळेच २ आॅगस्टला घोषित होणाºया पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात (बँकांना दिले जाणारे कर्ज) वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सत्रांचे म्हणणे आहे.इंधनदर असेल कळीचा मुद्दाइंधनाच्या दरात होणारी घसरण हाच पतधोरण आढाव्यात कळीचा मुद्दा असेल, असे स्टेट बँकेचेही म्हणणे आहे. कृषी मालाला दीडपट हमीभाव दिल्याने महागाई ०.७३ टक्के वाढू शकते.पण चांगला मान्सून व सातत्याने कमी होणारे इंधनदर यामुळे हमीभाव वाढीचा महागाईवर परिणाम होणार नाही, असे बँकेचे मुख्य आर्थिक संशोधक डॉ. सौम्य कांती घोष यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :खनिज तेलपेट्रोलडिझेलभारतीय रिझर्व्ह बँक