Join us

पीपीएफ अन् मुदतठेवींवरील व्याजदरात घट!

By admin | Updated: March 19, 2016 03:24 IST

भरीव व हमखास व्याज देणाऱ्या सुरक्षित योजना म्हणून गणल्या जाणाऱ्या पब्लिक प्रॉव्हिडंड फंड, मुदतठेवी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र अशा अनेक

नवी दिल्ली : भरीव व हमखास व्याज देणाऱ्या सुरक्षित योजना म्हणून गणल्या जाणाऱ्या पब्लिक प्रॉव्हिडंड फंड, मुदतठेवी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र अशा अनेक योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने सरासरी एक टक्क्यापर्यंत कपात केली आहे. ही दरकपात एक एप्रिलपासून लागू होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व बचत योजनांवरील व्याजदरात एक टक्का कपात केली आहे. व्याजदर कपात केलेल्या योजनांमध्ये सर्वात प्रमुख फटका हा पीपीएफ योजनेला बसणार असून यावरील व्याजदरात ८.७ टक्क्यांवरून ८.१ टक्के इतकी कपात करण्यात आली आहे. ही कपात तूर्तास एक एप्रिल ते ३० जून या कालावधीपुरती मर्यादित ठेवली आहे. तर किसान विकास पत्रावरील व्याजदरात ८.७ टक्के कपात केली आहे. अन्य काही योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. विविध बचत योजनांत मिळून आतापर्यंत सुमारे नऊ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून सरत्या तीन वर्षांत प्रत्येक वर्षी यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. बचत योजनांतील व्याजदरात कपात करत आता सरकारने कर्जावरील व्याजदर कपात करण्याचा चेंडू भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात सादर होणाऱ्या पतधोरणात व्याजदरात पाव टक्का कपात अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)अशी झाली दरकपात योजनासध्यानवे किसान विकासपत्र८.७७.८पोस्ट १ वर्ष मुदत८.४७.१पोस्ट २ वर्षे मुदत८.४७.२पोस्ट ३ वर्षे मुदत८.४७.४पोस्ट ५ वर्षे मुदत८.५७.४एनएससी (५ वर्षे)८.५८.१सुकन्या समृद्धी९.२८.६व्याजदर टक्क्यांमध्ये