तुमच्या साहेबांना आवर घाला अन्यथा... पोलिस अधिकार्यांनी उपटले मनपा कर्मचार्यांचे कान
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST
अकोला : कीर्तीनगरमधील महाप्रसादाचा कार्यक्रम उधळून लावणार्या मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात पोलिस तक्रार केल्यानंतर पित्त खवळलेल्या मनपा कर्मचार्यांनी नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे यांच्या विरोधात खदान पोलिसात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; परंतु तुमच्या साहेबांमुळे शहरातील कायदा अन् सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने त्यांना आवर घाला, अन्यथा पोलिसांना वेगळीच भूमिका घ्यावी लागेल, अशा स्पष्ट शब्दात पोलिस अधिकार्यांनी मनपा कर्मचार्यांचे कान उपटल्याची माहिती आहे. एकूणच, मनपातील वरिष्ठ अधिकार्यांच्या अतिउत्साहीपणामुळे प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगल्या जात असल्याचे चित्र आहे.
तुमच्या साहेबांना आवर घाला अन्यथा... पोलिस अधिकार्यांनी उपटले मनपा कर्मचार्यांचे कान
अकोला : कीर्तीनगरमधील महाप्रसादाचा कार्यक्रम उधळून लावणार्या मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात पोलिस तक्रार केल्यानंतर पित्त खवळलेल्या मनपा कर्मचार्यांनी नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे यांच्या विरोधात खदान पोलिसात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; परंतु तुमच्या साहेबांमुळे शहरातील कायदा अन् सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने त्यांना आवर घाला, अन्यथा पोलिसांना वेगळीच भूमिका घ्यावी लागेल, अशा स्पष्ट शब्दात पोलिस अधिकार्यांनी मनपा कर्मचार्यांचे कान उपटल्याची माहिती आहे. एकूणच, मनपातील वरिष्ठ अधिकार्यांच्या अतिउत्साहीपणामुळे प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगल्या जात असल्याचे चित्र आहे. रामदेव बाबा यांची दिव्य ज्योत अकोला शहरात असून, जम्मा जागरणच्या निमित्ताने रामदेव बाबा सेवा समिती, टेकडीवाल परिवारच्यावतीने कीर्तीनगरमध्ये महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन २८ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. खासगी भूखंडावर भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असताना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी घेतली काय, या मुद्यावरून साहित्य जप्त केले. प्रशासनाच्या हिटलरशाही कारवाईचा उपस्थित नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे यांसह नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर मनपा अधिकारी-कर्मचार्यांनी काढता पाय घेतला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रामदेव बाबा सेवा समितीसह भाजप पदाधिकारी-नगरसेवकांनी खदान पोलिस ठाण्यात उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात तक्रारवजा निवेदन दिले. या वादंगावर पडदा न टाकता उपायुक्त चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे व इतर कर्मचार्यांनी नगरसेवक अजय शर्मा, माजी नगरसेवक विजय इंगळे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मनपा कर्मचार्यांच्या अंगावर उलटला. उपस्थित काही पोलिस अधिकार्यांनी मनपा कर्मचार्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तुमचे साहेब कधीही ऊठतात, अन् वाेल त्या ठिकाणी तोडफोड करतात. हॉटेलमधील खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकतात. हिंदू धर्मियांचे सणासुदीचे दिवस असताना धार्मिक भावना दुखावण्याचे काम महापालिका प्रशासन करीत असल्याने त्याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे तुमच्या साहेबांना वेळीच आवर घाला, अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, अशा शब्दात मनपा कर्मचार्यांना सुनावले. शेवटी नाईलाजाने तक्रार मागे घेत, मनपा कर्मचार्यांना माघारी यावे लागले.